TET Scam : गैरव्यवहार प्रकरणातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर, तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश, टीईटी घोटाळा प्रकरण

| Updated on: Aug 08, 2022 | 11:21 AM

परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow us on

औरंगाबाद :  शिक्षक पात्रता परीक्षा (TET) म्हणजेच टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. परीक्षा परिषदेकडून टीईटी घोटाळ्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. परिषदेकडून या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षेत या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींची नावे आहेत. यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत.