Pahalgam Attack Updates : भारत – पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू

Pahalgam Attack Updates : भारत – पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू

| Updated on: Apr 27, 2025 | 12:03 PM

Bunker safety Kashmir LOC : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव वाढला आहे. यामुळे एकीकडे दोन्ही देशांच्या सैन्याकडून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे, तर दुसरीकडे सीमेवरच्या स्थानिक नागरिकांकडून बंकर सफाई सुरू करण्यात आली आहे.

हलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीर मधील नागरिकांकडून बंकर सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. लाइन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी सुरु करण्यात आलेली आहे. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यास नागरिकांच्या या उपाययोजना आता सुरू झालेल्या आहेत. पूर्वी गोळीबाराच्या वेळी लोक सरकारने पुरवलेल्या बंकरमध्ये आश्रय घेत असत. पहलगाम घटनेनंतर आता पुन्हा एकदा या बंकरच्या सफाईची तयारी तीव्र करण्यात आली आहे.

Published on: Apr 27, 2025 12:02 PM