Western railway Block : पश्चिम रेल्वेने प्रवास करताय? आज 4 तासांचा मेगाब्लॉक, कोणत्या वेळात आणि कधी असणार?

Western railway Block : पश्चिम रेल्वेने प्रवास करताय? आज 4 तासांचा मेगाब्लॉक, कोणत्या वेळात आणि कधी असणार?

| Updated on: May 03, 2025 | 11:33 AM

मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बघा नेमका कसा असेल ब्लॉक?

मुंबईतील पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल ते माहिम या रेल्वे स्थानकादरम्यान हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.१५ ते उद्या पहाटे ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सांताक्रुज ते चर्चगेट मार्गावर धावणाऱ्या जलद गाड्या धीम्या मार्गावरून जाणार आहे. दरम्यान, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रेल्वेमार्ग, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या तांत्रिक कामांसाठी आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेद्वारे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक कालावधीत सर्व फास्ट लोकल गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान स्लो लाईनवर वळवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Published on: May 03, 2025 11:33 AM