Local Mega Block News : मुंबईकरांनो…. या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर…
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या रविवारी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण येत्या रविवारी मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वे कडून सांगण्यात येत आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. दर रविवारी मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळख असणाऱ्या रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतो. या मेगाब्लॉक दरम्यान, रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामं हाती घेण्यात येतात. त्यामुळे रविवारी काही महत्त्वाची कामं करायची असेल किंवा काही प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी लोकलने पोहोचण्यासाठी विलंब होताना पाहायला मिळतो. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होताना दिसतो. मात्र येत्या रविवारी मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या रविवारी तुम्ही तुमची महत्त्वाची कामं किंवा फॅमिली सोबत बाहेर जाण्याचं नक्की नियोजन करू शकतात. दरम्यान, ४ मे रोजी नीटची परीक्षा असल्याने लोकलमार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
