पुढच्या दोन ते तीन दिवसात भोंग्याच्या वापरावर गाईडलाईन्स येणार – गृहमंत्र्यांची माहिती
मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif raj thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांनी दिली आहे.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif raj thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा वाद अधिकच वाढत गेला. यावर नाशिक जिल्ह्यात भोंगे लावण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरुन नाशकात राज ठाकरेंच्या वक्तव्याचा इफेक्ट झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता हा वाद अधिक वाढत असल्याचं दिसताच राज्य सरकारनं यावर जलद गतीने निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय.
