धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरुन कराडनं फोन केला आणि.. ; ज्ञानेश्वरी मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरुन कराडनं फोन केला आणि.. ; ज्ञानेश्वरी मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 17, 2025 | 6:37 PM

महादेव मुंडेंना 12 गुंठ्यासाठी मारल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केला.

महादेव मुंडेंना 12 गुंठ्यासाठी मारल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केला. पती महादेव मुंडेंच्या हत्येनंतर 18 महिने होऊनही न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ आल्याची खंत देखील सुरेश धसांनी व्यक्त केली. तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरुन वाल्मिक कराडनं फोन करुन तपास थांबवल्याचा गंभीर आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला.

22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. बुधवारी पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन केलं होतं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पप्पाच्या मारेकऱ्याला मारायचंय, हे लेकरांच्या मनातून काढायचं आहे असं सांगितलं. तसंच तपास न केल्यास 1 महिन्यात जीवन संपवणारच असा इशारा देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.

Published on: Jul 17, 2025 06:36 PM