VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 December 2021
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले. राऊताच्या फटकेबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आता यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.
