VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 23 June 2021

| Updated on: Jun 23, 2021 | 1:47 PM

एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, इकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत (Shiv Sena vs NCP) बिनसण्याचं चित्र आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Follow us on

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.