VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 3 January 2022

| Updated on: Jan 03, 2022 | 1:23 PM

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना येथून या मोहिमेला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले असून पालक, मुले, शाळा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला प्रोत्साहन द्यावे तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

Follow us on

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज राज्यभरात सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना येथून या मोहिमेला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले असून पालक, मुले, शाळा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला प्रोत्साहन द्यावे तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. जालना येथील महिला व बाल रुग्णालयात राजेश टोपे यांनी किशोरवयीनांच्या लसीकरणाला प्रारंभ केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आता पुढील टप्प्यात 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणाचीही मागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.