VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 24 March 2022
केंद्रीय तपास यंत्रणा सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणा सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. तरी तसं आम्ही करणार नाही. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. श्रीधर पाटणकर यांची एक संपती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. पूर्ण माहिती मिळाली की बोलू, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
