MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 02 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 02 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 8:22 AM

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

खरं तर सोमय्यांविरोधात दावा दाखल करत असल्याची माहिती अनिल परबांनी ट्विट करत दिली होती. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.