MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 21 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 21 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:57 AM

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचं सांगताना बायडन यांनी रेस्कू ऑपरेशननंतर संपूर्ण सैन्य अफगाणमधून बाहेर काढू, असंही सांगितलं.

जो बायडन म्हणाले, “पुढील आठवड्यात G 7 बैठकीत अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन केला जाणार नाही. तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला तर त्याला उत्तर देऊ. NATO देश अमेरिकेबरोबर उभे आहेत. आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जेलमधून निघालेले IS चे दहशतवादी हल्ला करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये संकट मोठं आहे.”