Namdev Shastri Video : शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर ‘त्या’ विधानावर टीकेची झोड

Namdev Shastri Video : शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर ‘त्या’ विधानावर टीकेची झोड

| Updated on: Mar 05, 2025 | 10:29 AM

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेयचे विदारक फोटो समोर आल्यानंतर सोशल मिडियात नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. काय आहे त्या मागचं कारण?

पाशवी वृत्तीच्या ज्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची कणव महंत नामदेव शास्त्री सानपांना आली होती. आज त्याच लोकांच्या क्रूर कृत्यांनंतर नामदेव शास्त्रींच्या मानसिकतेवर प्रश्न विचारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री सानपांचा आशीर्वाद घेतला. तर हत्येच्या दीड ते दोन महिन्यांनंतर शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र ते करत असताना मारेकऱ्यांना देशमुखांची हत्या का करावी, अशी मारेकऱ्यांची मानसिकता माध्यमांनी का समजून घेतली नाही? असा धक्कादायक प्रश्न शास्त्रींनी केला होता. या वक्तव्यात कुतर्काबरोबर तथ्यांचा देखील आभाव होता. जो वाद दोन गावातील लोकांमध्ये झाला त्याला शास्त्रींन एका गावाचं भांडण ठरवलं. वाद खंडणीतून उद्भवल्यानंतरही त्याला स्थानिक प्रश्न म्हणून संबोधलं. मारेकऱ्यां विरोधात जमाव आक्रमक होण्याआधी आरोपींनी पवन चक्कीत मारहाण आणि शिवीगाळ केली. हेच शास्त्रींनी सांगितलं नाही. आणि ज्या कुटुंबान पोरगा, नवरा, बाप, भाऊ गमावला ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्याबद्दल चकार शब्दही न काढणाऱ्या शास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची दखल घ्यावी वाटली. बघा काय केलं होतं वक्तव्य?

Published on: Mar 05, 2025 10:29 AM