“पोहरादेवीवर राजकारण नको”, महंत सुनील महाराज यांचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

“पोहरादेवीवर राजकारण नको”, महंत सुनील महाराज यांचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

| Updated on: Jul 16, 2023 | 9:53 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे महंत सुनील महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वाशिम : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे महंतं सुनील महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे आई, वडिलांनंतर कोणाला मानत असतील तर ते बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला मानतात.पोहरादेवी हे श्रद्धेच स्थान आहे. येथे कोणीही खोटी शपथ घेत नाही. पोहरादेवीवर राजकारण करू नये व अपमान करू नये. उद्धव ठाकरे हे शब्दाला जगणारे नेते असून त्यांनी पोहरादेवी येथे येऊन दर्शन घेणार असल्याचं सांगितले होते. त्याच शब्दाला पाळत त्यांनी दर्शन घेतले.”

Published on: Jul 16, 2023 09:53 AM