Aaditya Thackeray : चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये चांगलीच जुंपली
Maharashtra Assembly : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांच्यात 'चड्डी बनियान'च्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झालेली बघायला मिळाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांच्यात ‘चड्डी बनियान’ शब्दावरून तीव्र वादविवाद रंगला. सभागृहात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली की, मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत खूप संयम दाखवला आहे. आता त्यांनी मुंबईकरांच्या आणि शहरातील मागण्यांकडे लक्ष द्यावे, तसेच या ‘चड्डी बनियान गँग’वर कठोर कारवाई करावी.
या वक्तव्यावर नीलेश राणे यांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी ‘चड्डी बनियान’ हा शब्द सभागृहाच्या रूलिंगमधून काढून टाकण्याची मागणी केली. तसेच, आदित्य ठाकरे यांनी हिंमत असेल तर ‘चड्डी बनियान’ म्हणजे नेमके कोण, हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले. या वादामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
Published on: Jul 14, 2025 04:30 PM
