Assembly Monsoon Session LIVE : शेतकरी आत्महत्येचा मुद्दा सभागृहात तापला; अजितदादांनी केलं मोठं विधान

Assembly Monsoon Session LIVE : शेतकरी आत्महत्येचा मुद्दा सभागृहात तापला; अजितदादांनी केलं मोठं विधान

| Updated on: Jul 02, 2025 | 1:25 PM

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनात आज शेतकरी आत्महत्येच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झालेला बघायला मिळाला.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सभागृहात आज शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झालेला बघायला मिळाला आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर गदारोळ झाल्यानंतर उद्या यावर सभागृहात चर्चा केली जाईल असं सभागृहाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही चर्चेतून पळवाट काढत नाहीत. शेतकऱ्यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत. आम्ही पण शेतकरी आहोत. एखाद्याकडून वेगळ्या प्रकारचे वक्तव्य झाले असेल त्याचे कोणीच समर्थन करत नाही. आमची आज पण चर्चा करायची तयारी आहे. लोकांपुढे बाऊ केल्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. महायुतीचे सरकार प्रत्येक प्रश्नावर चर्चा करायला तयार आहे, असं अजितदादांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

Published on: Jul 02, 2025 01:24 PM