‘चड्डी-बनियान गँग’वरुन विधानसभेत घमासान, कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर… विरोधकांना राणेंचं चॅलेंज

‘चड्डी-बनियान गँग’वरुन विधानसभेत घमासान, कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर… विरोधकांना राणेंचं चॅलेंज

| Updated on: Jul 15, 2025 | 9:43 AM

चड्डी-बनियान गँग या शब्दावरून विधानसभेत घमासान पाहायला मिळालं जर मंत्र्यांच्या बेडरूममधले व्हिडिओ बाहेर येत असतील तर जनतेचं काय? असा सवाल करत विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे हिंमत असेल तर नाव घेऊन बोलण्याचं आव्हानच निलेश राणे यांनी दिल आहे.

सध्या वादात सापडलेल्या काही मंत्र्यांची तुलना विरोधकांनी चक्क चड्डी-बनियान गँगशी केलीये. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कधीकाळी चड्डी-बनियान गँगने धुमाकूळ घातला होता. त्याच गँगशी सरकारच्या मंत्र्याची तुलना करत अनिल परबांनी सरकारला सवाल केले.  तर, काही दिवसांपूर्वी टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत मंत्री भरत गोगावले यांचा मंत्रतंत्र करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर टॉवेल आणि बनियानवर सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयातल्या कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारलं आणि आता सिगरेटचे झुरके घेत बनियान घातलेल्या मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर आला. ज्यात पैशाच्या बंडलानी भरलेली एक बॅगही दिसल्याने वाद रंगलाय. त्यामुळे सरकारने जन सुरक्षा विधेयकाद्वारे लोकांच्या आधी त्यांच्या मंत्र्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असाही टोला विरोधकांनी लगावला आहे. 

दरम्यान या निमित्ताने काही सवाल उपस्थित केले जाताहेत. मंत्री शिरसाट यांच्या बेडरूममधला व्हिडिओ बाहेर नेमका कसा आला? शिरसाट यांच्या दाव्यानूसार जर नोटांच्या बॅगेचा व्हिडिओ खोटा आहे तर मग खरा व्हिडिओ कुणाकडे? एकामागोमाग एक केवळ शिंदे यांच्याच नेत्यांचे व्हिडिओ बाहेर कसे येतायेत? ज्या व्यक्तीला शिरसाट यांच्या बेडरूमपर्यंत प्रवेश मिळतो त्याच व्यक्तीने तो व्हिडिओ बाहेर कसा दिला? व्हिडिओ हेतू पुरस्कर व्हायरल झाला की मग मोबाईल मधून तो चोरला गेला. मंत्री शिरसाट स्वतःहून त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणणार का? नोटांच्या बॅगेचा आरोप खरा की खोटा याबद्दल व्हिडिओची पडताळणी सरकार किती दिवसात करणार? असे अनेक प्रश्न या व्हायरल व्हिडीओजवरून उपस्थित होताहेत.

Published on: Jul 15, 2025 09:43 AM