Maharashtra HSC Result 2025 : बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार

Maharashtra HSC Result 2025 : बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार

| Updated on: May 04, 2025 | 3:43 PM

Maharashtra Board 12th Result Date : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिलेल्या निकालाची अखेर तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

Published on: May 04, 2025 03:17 PM