Maharashtra Cabinet Expansion : नागपूरात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये ‘ती’ खूर्ची कोणासाठी?

Maharashtra Cabinet Expansion : नागपूरात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये ‘ती’ खूर्ची कोणासाठी?

| Updated on: Dec 15, 2024 | 4:32 PM

आज होणाऱ्या शपथविधीसोहळ्यासाठी आतापर्यंत महायुतीच्या ज्या ३९ आमदारांना फोन करण्यात आला आहे. ज्यामध्ये भाजप २०, शिवसेना शिंदे गट १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजभवनात सध्या तयारी पूर्ण...

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूरमध्ये होत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण ३९ आमदारांना फोन करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या शपथविधीसोहळ्यासाठी आतापर्यंत महायुतीच्या ज्या ३९ आमदारांना फोन करण्यात आला आहे. ज्यामध्ये भाजप २०, शिवसेना शिंदे गट १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजभवनात सध्या तयारी पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी मंत्रिपदाची शपथ ज्या मुख्य व्यासपीठावरून घेण्यात येणार आहे, त्या ठिकाणी ३९ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठावर ३९ खुर्च्या या नवनिर्वाचित मंत्र्यासाठी लावण्यात आल्या आहेत. या ३९ पैकी पहिल्या रांगेत २० खुर्च्या या कॅबिनेट मंत्र्यांसाठी असण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या रांगेत १९ खुर्च्यांची व्यवस्था आहे. ही सर्व व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून नवनिर्वाचित मंत्री शपथ घेणार आहेत तिथे राज्यपालांची एक खुर्ची असणार आहे. त्याच्या आजू-बाजूला तीन विशेष खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यात एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आण दोन खुर्च्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी असणार आहे. तर समोरच्या बाजूला असलेल्या भागात विशेष निमंत्रकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Published on: Dec 15, 2024 04:32 PM