Bihar Election Results : बिहारमध्येही फडणवीसांची हवा, थेट 48 मतदारसंघात धुरळा, NDA ला नेमका काय बुस्ट मिळाला?

Bihar Election Results : बिहारमध्येही फडणवीसांची हवा, थेट 48 मतदारसंघात धुरळा, NDA ला नेमका काय बुस्ट मिळाला?

| Updated on: Nov 15, 2025 | 4:34 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.

बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) लक्षणीय यश मिळाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या हातभारामुळे NDA ने 48 मतदारसंघांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. त्यांच्या प्रचारामुळे एकूण 61 मतदारसंघांवर प्रभाव दिसून आला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष प्रचार केलेल्या 13 पैकी 10 ठिकाणी NDA उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. यात भाजपच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या  प्रचाराचा सर्वाधिक फायदा लोक जनशक्ती पक्षाला (LJP) झाल्याचेही निरीक्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील सात जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या, ज्याचा परिणाम NDA च्या विजयात महत्त्वाचा ठरला.

 

 

Published on: Nov 15, 2025 04:34 PM