Anti-Conversion Law : महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार

Anti-Conversion Law : महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार

| Updated on: Jul 14, 2025 | 5:24 PM

राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाणार असल्याची माहिती आज अधिवेशनात देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मांतराच्या घटना घडत असल्याचा मुद्दा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, यासंदर्भात तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

भोयर यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतराला परवानगी नाही. समितीने केलेल्या अभ्यासात सुमारे 35 प्रकरणे समोर आली, परंतु यामध्ये स्वेच्छेने धर्मांतर केल्याचे आढळले. काही संस्था साध्या-सरळ लोकांना धर्मांतरासाठी प्रेरित करत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली असून, पुढील महिन्यात तिचा अहवाल सादर होईल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की, देशातील 10 राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू आहे, महाराष्ट्रात असा कायदा कधी लागू होणार? यावर भोयर यांनी उत्तर दिले, महाराष्ट्र हे 11 वे राज्य असेल, जिथे धर्मांतरविरोधी कायदा लागू होईल, आणि तो अत्यंत कठोर स्वरूपाचा असेल.

Published on: Jul 14, 2025 05:24 PM