पिंपरी चिंचवड हादरलं! वाढदिवशीच प्रियसीवर सपासप केले वार अन् …

पिंपरी चिंचवड हादरलं! वाढदिवशीच प्रियसीवर सपासप केले वार अन् …

| Updated on: Oct 12, 2025 | 12:37 PM

पिंपरी चिंचवड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकू आणि ब्लेडने वार करून हत्या केली. घटनेनंतर प्रियकराने स्वतः कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन आत्मसमर्पण केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केलीय. शहरातील ही घटना अत्यंत धक्कादायक असून, प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर काही वेळातच प्रियकराने प्रेयसीवर चाकू आणि ब्लेडने अनेक वार करत तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याला अंजाम दिल्यानंतर प्रियकर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. त्याने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे प्रेमसंबंधातील ताणतणाव आणि त्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, हत्येमागील नेमकं कारण काय होतं, याचा शोध घेतला जात आहे. प्रियकराने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: Oct 12, 2025 12:33 PM