कुबड्या vs बुगड्या… भाजपच्या स्वबळाच्या दाव्याने नव्या वादाला फुटले तोंड, कशावरून रंगला वाद?

कुबड्या vs बुगड्या… भाजपच्या स्वबळाच्या दाव्याने नव्या वादाला फुटले तोंड, कशावरून रंगला वाद?

| Updated on: Oct 29, 2025 | 11:00 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शाह यांच्या भाजप स्वबळावर या विधानावरून कुबड्या आणि बुगड्या हा वाद पेटला आहे. विरोधकांनी शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य करत, स्वाभिमान असल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. तर फडणवीसांनी मित्र म्हणजे कुबड्या नाहीत असे स्पष्ट केले. महायुतीमध्ये मात्र अंतर्गत अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे.

अमित शाह यांनी महाराष्ट्रात भाजप कुबड्यांवर नव्हे, तर स्वतःच्या हिमतीने उभी असल्याचा दावा केला. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कुबड्या आणि बुगड्यांवरून नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला लक्ष्य करत प्रश्न विचारला आहे की, जर ते कुबड्या नाहीत, तर मग बुगड्या आहेत का? विरोधकांनी म्हटले आहे की, भाजपने शिंदे आणि दादांच्या कुबड्यांची गरज संपल्यामुळे त्यांना आता दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले की, “मित्र म्हणजे कुबड्या नसतात.” परंतु, विरोधकांनी भाजपच्या या भूमिकेवर तीव्र टीका करत म्हटले आहे की, गरज सरो, वैद्य मरो अशी भाजपची वृत्ती आहे. काही विरोधकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना स्वाभिमान असल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शिंदे आणि अजित पवार गटाने मात्र आपल्याला कुणीही कुबड्या म्हटलं नसल्याचा दावा करत विरोधकांवर टीका केली आहे.

Published on: Oct 29, 2025 11:00 AM