CM Devendra Fadnavis : परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Fadnavis On Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत केली जाणार आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज महायुती सरकारने पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांच्या कुटुंबांना 50 लाखांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, ‘राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. दहशतवादामुळे ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, हे दाखवण्याचाच हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये, तसेच रोजगाराचा प्रश्न असेल तर नोकरीची संधी दिली जाणार आहे. तसेच शिक्षणाचा प्रश्न असेल तर शिक्षणाचा खर्च देखील राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Published on: Apr 29, 2025 03:44 PM
