एवढं धाडस येतं कुठून? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले

एवढं धाडस येतं कुठून? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले

| Updated on: Jan 11, 2026 | 12:08 PM

भाजपने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवकपद दिलं होतं. त्यावरून महाराष्ट्रभरातून भाजपवर हल्लाबोल झाला. त्यानंतर आपटेने राजीनामा माघार घेतला होता. त्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.

भाजपने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवकपद दिलं होतं. त्यावरून महाराष्ट्रभरातून भाजपवर हल्लाबोल झाला. त्यानंतर आपटेने राजीनामा माघार घेतला होता. त्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला अटक झाली .तरी सुद्धा उघड पणे ते संघाचं काम करत होते, हा त्यांचा प्रश्न आहे. पण भाजपवाले त्यांचं निर्दोषत्व सिद्ध न करता त्यांना स्वीकृत सदस्य करतात, एवढं धाडस येतं कुठून? असा सवालच संजय राऊतांनी केला आहे. मी या सगळ्यावर संशोधन करणार, असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्रात ज्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली होती, त्यातीलच सहआरोपीला स्वीकृत नगरसेवक करता तुम्हाला लाजा वाटत नाही का? असा टोला राऊतांनी लगावला आहे. जी परिस्तिथी उत्तरप्रदेशमध्ये आहे तीच महाराष्ट्रात देखील आहे. कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे, असं थेट आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.

Published on: Jan 11, 2026 12:08 PM