Maharashtra Local Body Election :  मोहळमध्ये 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे हिची नगराध्यक्षपदी निवड, शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवार

Maharashtra Local Body Election : मोहळमध्ये 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे हिची नगराध्यक्षपदी निवड, शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवार

| Updated on: Dec 21, 2025 | 3:30 PM

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने आपला झेंडा फडकवला आहे. २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. या विजयामुळे त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या आणि मोहळच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व विजय मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून, त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष बनल्या आहेत. तसेच, त्या मोहळच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. आपल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धी वस्त्रे यांनी मोहळच्या मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी दिली, यासाठी त्या कृतज्ञ आहेत. प्रचारादरम्यान त्यांच्यावर आणि पक्षावर अनेक टीका झाल्या, मात्र विजयाने या टीकेला सडेतोड उत्तर दिल्याचे त्यांनी नमूद केले. मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रमेश बारसकर आणि उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे वस्त्रे यांनी सांगितले.

Published on: Dec 21, 2025 03:30 PM