Mahayuti Discord: दिल्लीच्या भेटीत वेगळंच घडलं? वाद महाराष्ट्रात रिटर्न! महायुतीतील कुरघोड्या उघड?

Mahayuti Discord: दिल्लीच्या भेटीत वेगळंच घडलं? वाद महाराष्ट्रात रिटर्न! महायुतीतील कुरघोड्या उघड?

| Updated on: Nov 22, 2025 | 10:43 PM

महायुतीत सुरू असलेल्या नाराजीनाट्यावरून एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, महाराष्ट्रातील वाद दिल्लीत न आणता राज्यातच सोडवण्याच्या सूचना त्यांना हाय कमांडकडून मिळाल्या. भाजपसोबतच्या स्थानिक पातळीवरील कुरबुरी, मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील अबोला यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट दिसतोय.

महायुतीतील अंतर्गत नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपसोबतच्या मतभेदांनंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली. सूत्रांनुसार, शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात फोडाफोडीवरून तक्रार केली. मात्र, दिल्लीतील हाय कमांडने महाराष्ट्रातील वाद दिल्लीत न आणता ते राज्यातच सोडवण्याची सूचना शिंदे यांना केली आहे. महायुतीतील घटक पक्षांनी समन्वय साधून वाद मिटवावेत आणि जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे टाळावे, असेही दिल्लीतून स्पष्ट करण्यात आले.

डोंबिवलीतील पक्षप्रवेशाच्या घटनेनंतर शिंदे गटाने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला होता. यानंतरही नाराजी दूर झाली नसल्याचे दिसून आले. अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी “रडणारा नाही लढणार” असल्याचे सांगून आपला निर्धार व्यक्त केला. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अबोला आणि दूरावा स्पष्टपणे दिसला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Nov 22, 2025 10:43 PM