मराठा समाजाच्या 10 % आरक्षणाच्या सुनावणीत काय झाले?

मराठा समाजाच्या 10 % आरक्षणाच्या सुनावणीत काय झाले?

| Updated on: Sep 13, 2025 | 3:39 PM

मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी 10% आरक्षणाबाबत सुनावणी सुरू आहे. अॅड. प्रदीप संचेती यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून मराठा समाज मागास नाही, असा युक्तीवाद केला आहे. त्यांनी शिक्षणात 72% मराठा विद्यार्थी ओपन कॅटेगरीत असल्याचेही म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% एसईबीसी आरक्षणाबाबत एक महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत अॅड. प्रदीप संचेती यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून मराठा समाज मागास नाही, असा युक्तीवाद केला आहे. त्यांनी आपल्या युक्तीवादात ओपन कॅटेगरीत 72% मराठा विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी मराठा समाजासाठीही आरक्षणाचा विचार केल्याने एकाच समाजाला दोनदा आरक्षण मिळण्याच्या शक्यतेवर संचेती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ओबीसी समाजाकडूनही या आरक्षणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सुनावणीचा निकाल मराठा समाजासह राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पाडेल.

Published on: Sep 13, 2025 03:39 PM