मराठा आणि कुणबी… सातारा गॅझेटमध्ये काय ?
सातारा गॅझेटमधील मराठा आणि कुणबी समाजाबाबतच्या ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर हा आढावा घेतला जात आहे. १८८५ च्या सातारा गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी समाजातील एकरूपतेचा उल्लेख आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत सातारा गॅझेटची नोंदी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्यानंतर सरकारने या गॅझेटमधील माहितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. १८८५ च्या सातारा गॅझेटियरमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे आणि कुणबी यांच्यातील वंशपरंपरा, विवाहपद्धती आणि व्यवसायातील समानतेचा उल्लेख आहे. या नोंदींवरून मराठा आणि कुणबी हे एकच समाज आहेत असा दावा केला जात आहे. मराठा आरक्षण उपसमिती पुढच्या आठवड्यात याबाबतचा अहवाल सादर करेल, ज्यावरून पुढील निर्णय घेतला जाईल. हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने सातारा गॅझेटवरही निकष लावण्यात येतील अशी माहिती आहे. सरकारने १९६७च्या पूर्वीच्या कुणबी नोंदींच्या उपलब्धतेवरही भर दिला आहे.
Published on: Sep 14, 2025 09:14 AM
