Pahalgam Attack : गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना; 4 पार्थिव मुंबईत, तर 2 पार्थिव पुण्यात येणार

Pahalgam Attack : गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना; 4 पार्थिव मुंबईत, तर 2 पार्थिव पुण्यात येणार

| Updated on: Apr 23, 2025 | 2:56 PM

Maharashtra Tourist Deaths Kashmir : पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव मुंबई आणि पुणे विमानतळावर येणार आहेत. त्यासाठी मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना झाले आहे.

राज्यातील पर्यटकांच्या समन्वयासाठी गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावर मंत्री शेलार, लोढा हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. तर पुणे विमानतळावरील समन्वयाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काश्मीरच्या घटनेत महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या सहा लोकांचे पार्थिव महाराष्ट्रात येणार आहे. 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. 3 पार्थिवर हे पुण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई विमानतळावर आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे समन्वयासाठी उपस्थित असणार आहेत. पुण्यात मुरलीधर मोहोळ हे स्वत: लक्ष घालत आहेत. तर माधुरी मिसाळ या विमानतळावर उपस्थित राहणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Published on: Apr 23, 2025 02:56 PM