Sansad Ratna : संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारली; 7 खासदार ठरले संसदरत्न
महाराष्ट्रातले 7 खासदार संसदरत्न ठरलेले आहेत. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरित होऊन 2010 मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली होती.
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारलेली आहे. महाराष्ट्रातले 7 खासदार संसदरत्न ठरलेले आहेत. यात सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, म्हस्के यांना पुरस्कार मिळाला आहे. स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना देखील संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह आणखीही काही खासदार संसदरत्न पुरस्कारासाठी निवडले गेलेले आहेत.
भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरित होऊन 2010 मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली होती. संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. हा पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये संसदेतील अनुभवी सदस्य आणि सदस्य नसलेल्यांपैकी तज्ज्ञ लोकांचा समावेश असतो. या पुरस्कारासाठी नावं जाहीर करताना विविध बाबी तपासल्या जातात. सदस्यांच्या कामगिरीचा डेटा काढला जातो. संसदेतील चर्चेत किती सहभाग होता, हे पाहिलं जातं.
