न्यायालयीन लढाई लढून पुन्हा…; जैन मुनींचं मोठं विधान

न्यायालयीन लढाई लढून पुन्हा…; जैन मुनींचं मोठं विधान

| Updated on: Oct 12, 2025 | 4:57 PM

दादरमधील कबुतरखाना बंद केल्याने जैन मुनी आक्रमक झाले आहेत. दिवंगत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केल्यानंतर, मुनींनी कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावर जैन समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कबुतरांच्या मृत्यूला जबाबदार धरून, मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाने नुकतीच एक प्रार्थना सभा आयोजित केली होती.

या सभेनंतर दादर जैन मंदिरातील जैन मुनींनी कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, न्यायालयीन पद्धतीनं लढा देऊन कबुतरखाना पुन्हा सुरू केला जाईल. तसेच, सध्याचा निकाल समाधानकारक नसल्यास नवा पक्ष उभा करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.  जैन मुनींनी कबुतरखान्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “आम्ही कबुतरखान्याची रक्षा करू, भलेही आम्हाला जीव गमवावा लागला तरी चालेल.” त्यांनी कबुतरखान्याच्या संदर्भात भारतीय संविधानात काय नमूद आहे, असा प्रश्न उपस्थित करत, लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींबाबतही चर्चा केली. एक पर्याय म्हणून, त्यांनी मरीन लाईन्स येथील लोढांचा जैन क्लब, जो पूर्वी ग्रँड मेडिकल जिमखाना होता, त्याच्या मैदानात कबुतरखाना सुरू करण्याची सूचना केली. तेथे जाऊन कबुतरांना दाणे घालण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

Published on: Oct 12, 2025 04:57 PM