Cyclone Shakti : अतिवृष्टीनंतर पुन्हा नवं सकंट, ‘या’ जिल्ह्यात शक्ती चक्रीवादळ येणार! देशातील 14 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Shakti : अतिवृष्टीनंतर पुन्हा नवं सकंट, ‘या’ जिल्ह्यात शक्ती चक्रीवादळ येणार! देशातील 14 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: Oct 04, 2025 | 11:10 AM

महाराष्ट्रामध्ये 3 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत शक्ती चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारताच्या 14 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, यात महाराष्ट्राचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण किनारपट्टीला याचा फटका बसेल. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे, देशातील 14 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राला शक्ती चक्रीवादळाचाही मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील काही आठवड्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले होते. आता 3 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी आणि नागरिकांनी हवामानाचे अंदाज पाहूनच प्रवास करावा, असेही कळवण्यात आले आहे. त्यामुळे, आगामी काही दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Oct 04, 2025 11:10 AM