Special Report | संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा कोणता मेसेज पवारांना दिला?

Special Report | संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा कोणता मेसेज पवारांना दिला?

| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 10:25 PM

राज्यात सध्या कोरोनाचा संसर्गाचा वेग थोडा नियंत्रणात आला आहे. तरी तिसऱ्या लाटेची भीती ही आहेच. मात्र, हे कोरोना संकट सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना देखील वेग आला आहे.

Special Report | राज्यात सध्या कोरोनाचा संसर्गाचा वेग थोडा नियंत्रणात आला आहे. तरी तिसऱ्या लाटेची भीती ही आहेच. मात्र, हे कोरोना संकट सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना देखील वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात खरंच पुन्हा एकदा राजकीय भूकंप वगैरे घडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सतावताना दिसतोय. कारण शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. | Maharashtra Political Happenings latest Sanjay Raut Uddhav Thackeray Sharad Pawar meeting.

Published on: Jun 28, 2021 10:25 PM