BMC Election 2025 : मुंबई पालिकेसाठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची निवडणूक समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
मुंबई महानगरपालिका 2025 निवडणुकीसाठी भाजपने 20 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यात पियुष गोयल, आशिष शेलार, विनोद तावडे यांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिका 2025 च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. भाजपने मुंबई पालिकेसाठी 20 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या समितीत पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम आणि अतुल भातखळकर यांसारख्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पालिकेच्या निवडणुकीत पक्षाची रणनीती ठरवण्यात आणि उमेदवारांची निवड करण्यात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल. दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेने तुलना ठाकरी तेजपर्व अन् काळ्या गद्दारयुगाची अशी टॅगलाईन असलेली नवीन पुस्तिका प्रकाशित केली आहे. मुंबईसाठी केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुस्तिका प्रचारात वापरली जाईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
Published on: Dec 19, 2025 12:19 PM
