Devendra Fadnavis : हिंदीच्या वादानंतर आता इंग्रजी शाळेवरून राजकीय हंगामा…फडणवीसांनी आदित्य अन् अमित ठाकरेंना घेरलं

Devendra Fadnavis : हिंदीच्या वादानंतर आता इंग्रजी शाळेवरून राजकीय हंगामा…फडणवीसांनी आदित्य अन् अमित ठाकरेंना घेरलं

| Updated on: Jul 03, 2025 | 8:36 AM

हिंदीचा विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना त्यांनी घेरलं आहे. स्वतः बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून इंग्रजीला पायघड्या घालतात आणि भारतीय भाषेला विरोध करतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मग या शाळाच बंद करा असा आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

हिंदीचा मुद्दा आता आदित्य आणि अमित ठाकरेंच्या शाळेपर्यंत आला आहे. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून इंग्रजीला पायाघड्या घालायच्या आणि हिंदीला विरोध करायचा असा थेट निशाणा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर साधला. त्यावरून आता राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. मोदींना सांगून महाराष्ट्र आणि देशातल्या इंटरनॅशनल शाळा बंद करून टाका, असं राऊत म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे माहिमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये शिकले तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर मराठी प्रेम असणाऱ्या नेत्यांनी आपल्या नातवाला मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावं असा टोला अमोल मिटकरींनी नाव न घेता राज ठाकरेंना लगावला आहे. इतकंच नाहीतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी शाळांसह फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुंबई तोडण्याच्या वक्तव्यावरूनही घेरलं त्यावरूनही शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली आहे.

Published on: Jul 03, 2025 08:36 AM