महाराष्ट्राला मोठी भेट: २ रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची मंजुरी

महाराष्ट्राला मोठी भेट: २ रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची मंजुरी

| Updated on: Aug 01, 2025 | 11:03 AM

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर-परभणी आणि इटारसी-नागपूर या मार्गांना हा लाभ मिळाला आहे.

केंद्राकडून महाराष्ट्रातील दोन रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची मंजुरी मिळाली आहे. यात छत्रपती सांभाजीनगर ते परभणी आणि इटासरी ते नागपूर मल्टीट्रॅकिंगची मान्यता मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने भारतीय रेल्वेच्या विस्तारासाठी चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे भारतीय रेल्वेचे जाळे ५७४ किलोमीटरने वाढणार असून, हे प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड या राज्यांना या प्रकल्पांचा थेट लाभ होणार आहे. मंजूर झालेल्या चार रेल्वे प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. यामध्ये इटारसी-नागपूर दरम्यान चौथा रेल्वे मार्ग आणि छत्रपती संभाजीनगर-परभणी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण यांचा समावेश आहे.

Published on: Aug 01, 2025 11:03 AM