Maharashtra Rain Update : येत्या 24 तासात… राज्यात मान्सूनचा जोर वाढणार? हवामान खात्याचा मोठा इशारा काय?

Maharashtra Rain Update : येत्या 24 तासात… राज्यात मान्सूनचा जोर वाढणार? हवामान खात्याचा मोठा इशारा काय?

| Updated on: May 26, 2025 | 2:14 PM

अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. तर येणाऱ्या काही दिवसांसाठी कोकणात, मध्य महाराष्ट्र, पुणे विभागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.

गेल्या तीन दिवसापूर्वी केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचं देशात मान्सून कधी दाखल होणार याकडे लक्ष लागून असताना केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं. यानंतर तळ कोकणासह मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. अशातच राज्यात येत्या चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईमध्ये भारतीय हवामान खात्याकडून हा इशारा देण्यात येणार आहे. तर मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असताना पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी महाराष्ट्रातील मान्सून यासंदर्भात भाष्य केले आहे. ‘काल देवगडपर्यंत मान्सूनने प्रवास केला. तर आज मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र येत्या २४ तासात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.’, असं सानप म्हणाले.

Published on: May 26, 2025 02:14 PM