Parbhani Rain | परभणीत पावसाचं थैमान, स्कॉर्पिओ वाहून जाताना गावकऱ्यांनी 7 जणांना वाचवलं

| Updated on: Sep 01, 2021 | 8:53 AM

परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवर असलेल्या ढालेगांव बंधाऱ्याची 11 गेट उघडण्यात आले असून त्या मधून 70 हजार क्यूसेक गोदीवरी नदी पत्रात विसर्ग सुरू आहे... शिवाय त्या खाली असलेल्या तारुगव्हानच्या 10 गेट मधून 62 हजार क्यूसेगने तर मुदगलबंधाऱ्याच्या 7 गेट मधून  50 ते 55 हजार क्यूसेगने विसर्ग गोदावरी नदी पत्रात करण्यात येतोय.

Follow us on

परभणीत पावसाचं थैमान पाहायला मिळत असून स्कॉर्पिओ गाडी वाहून जात असताना गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत 7 जणांना वाचवलं आहे. पाथरी तालुक्यातील पिंपळगाव गावाजवळील नदीवरील पुलावर असणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज स्कॉर्पिओ जीप चालकाला न आल्याने स्कॉर्पिओ नदीपात्रात पडल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाथरी तालुक्यातील बाभळगाव मार्गे वाघाळा फाटा कडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी चाटे पिंपळगाव गावाजवळ आली असता गावाजवळून वाहणाऱ्या नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीप सरळ नदीपात्रात पडली आहे. घटना घडली तेव्हा गाडीमध्ये पाच प्रवासी बसल्याची माहिती कळत असून सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच चाटे पिंपळगाव येथील उपसरपंच गणेश काळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली गाडी बाहेर काढली आहे. दरम्यान या नदीवर विनाकठडे व कालबाहय झालेल्या पुलामुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत ग्रामस्थ सदरील पुलाला नव्याने तयार करा त्याची उंची वाढवावी यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना या ठिकाणी घडत आहेत .