राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना…
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल चार शहरांना मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि महानगरपालिका यंत्रणा सतर्क करण्यात आली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.