Rain Update : रायगडमध्ये पावसाचा कहर, नद्या ओव्हर फ्लो अन् नागोठणे एसटी स्टँड पाण्यात, बघा व्हिडीओ..

Rain Update : रायगडमध्ये पावसाचा कहर, नद्या ओव्हर फ्लो अन् नागोठणे एसटी स्टँड पाण्यात, बघा व्हिडीओ..

| Updated on: Jun 19, 2025 | 3:43 PM

नागोठणे शहरात आंबा नदीची पाणी पातळी वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तासह बॅरिकेटिंग लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. प्रशासन सतर्क असून, नागरिकांना नागोठणे शहरात अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

रायगडमध्ये पावसाचा जोर वाढत असतानाच कुंडलिक नदीने आता धोका पातळी ओलांडली आहे. सध्या या नदीची पाणी पातळी 24.50 मीटरवर पोहोचली आहे. नदीची धोका पातळी 23.95 आहे मात्र आता पाणी पातळी 24.10 वर पोचली आहे तर तिकडे आंबा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर 10.20 मी वर पोहोचली आहे. अशातच नागोठणे येथील एसटी स्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज परिसरात सध्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला असून, नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विशेषतः रोहा, नागोठणे आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून, त्यामुळे नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: Jun 19, 2025 03:43 PM