Weather Update | राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?

Weather Update | राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?

| Updated on: Sep 24, 2023 | 1:36 PM

Maharashtra Rain Update | विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा चांगलाच पाऊस सक्रीय, दोन दिवस विदर्भाला झोडपून काढल्यानंतर आता राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | राज्यात बुधवारीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रपर्यंत तीव्र कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण होतो. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. याचा परिणाम जास्त विदर्भात असणार आहे. तर बुधवारपर्यंत राज्याला हवामान विभागाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर 27 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला असून रविवारी पुन्हा नागपूर जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Published on: Sep 24, 2023 12:46 PM