Chhagan Bujbal : उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?
उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. दरम्यान, या योजनेच्या अनुदानासाठी सध्या 20 कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेल्या या योजनेमध्ये गरीब आणि गरजू लोकांना 10 रुपयांत जेवण दिलं जातं. 1 जानेवारी, 2020 रोजी एक निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातल्या राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन सुरू करण्यात आले. या योजनेला शिवभोजन थाळी असे म्हटले जाते. 26 जानेवारी 2020 पासून ही योजना सुरू झाली. या शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व 1 मूद भात देण्यात येतो. ही योजना सुरू करण्यासाठी शिवभोजन नावाचे अॅपही तयार करण्यात आले.
