शिंदे -फडणवीस सरकारमध्ये अर्थराज्यमंत्रिपद नाही; मग अर्थसंकल्प कोण सादर करणार?

| Updated on: Mar 08, 2023 | 10:16 AM

Maharashtra Budget Session 2023 : उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री पदं नाही. त्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार? पाहा...

Follow us on

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री पदं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच मंत्र्यांची नावं विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुचवली जाणार आहेत. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल.विधानपरिषदेत खातं आणि जबाबदारी पाहून संधी मिळणार असणार असल्याची माहिती आहे. लवकरच ही नावं पाठवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.