वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ

| Updated on: Nov 21, 2021 | 12:52 PM

कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे.

Follow us on

मुंबई: कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे. दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा रखडल्या होत्या त्या आज कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली आहे.   मात्र, एसटीच्या संपाच्या वेळी महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मत परीक्षार्थींनी मांडलं. नेहरु हायस्कूल केंद्रावर हा प्रकार घडला. तर, दुसरीकडे धुळे जिल्ह्यात खासदार सुभाष भांबरे यांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना 20 मिनिटांनंतरही प्रवेश मिळाला.