Liquor Licenses : मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने जारी

Liquor Licenses : मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने जारी

| Updated on: Jul 13, 2025 | 3:50 PM

राज्यात नवे 328 मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. हे परवाने भाड्याने देण्याची परवानगीही असेल.

महाराष्ट्र सरकारने गेल्या 50 वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला असून, राज्याचा महसूल वाढवण्यासाठी 328 नवीन मद्यविक्री परवाने जारी करण्याची योजना आहे. विदेशी मद्यनिर्मिती परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीनुसार, हे 328 नवे परवाने थेट दुकानांना नव्हे, तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. प्रत्येक कंपनीला 8 परवाने मिळणार असून, हे परवाने भाड्याने देण्याची परवानगीही असेल. या परवाना वितरणासाठी स्थापन होणाऱ्या समितीत अजित पवार यांचा समावेश आहे. मात्र, कॅपोव्हिटेज या मद्यनिर्मिती कंपनीच्या संचालकपदी जय पवार असल्याने हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Published on: Jul 13, 2025 03:50 PM