BMC Election Seat-Sharing : महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, 180 जागांवर एकमत अन् भाजपचा ‘या’ जागांवर दावा
मुंबई महानगरपालिकेसाठी महायुती (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास १८० जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरित ३० ते ४० जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज तिसरी महत्त्वाची चर्चा होणार आहे. भाजपने निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवर दावा केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत सुमारे १८० जागांवर एकमत झाले आहे. महायुतीच्या जागावाटपासाठी आज तिसरी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उर्वरित जागांवर चर्चा करतील. आजच्या चर्चेत आणखी ३० ते ४० जागांसंदर्भातील तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपने विशेषतः गेल्या निवडणुकीत निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवर आपला दावा केला आहे. यामुळे काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जागावाटप लवकरच अंतिम केले जाईल अशी अपेक्षा आहे.
Published on: Dec 23, 2025 05:16 PM
