Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? 2100 मिळणार की नाही? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय तरी काय?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? 2100 मिळणार की नाही? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय तरी काय?

| Updated on: Apr 19, 2025 | 1:08 PM

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार... नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होणार ही खोटी बातमी आहे. कोणत्याही महिलेचे पैसे कमी केले जाणार नाहीत, असेही मुश्रीफांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आली. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहे. मात्र पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रूपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र अद्याप ते काही सत्यात उतरलं नाही. अशातच या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर लाडक्या बहिणी देखील 2100 रूपये कधी मिळणार याची वाट बघत आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांबाबत महायुतीमधील एका बड्या मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं खरं पण यासोबत केलेल्या वक्तव्याने विरोधकांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘2100 रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे’, असं मुश्रीफ म्हणाले. तर मुश्रीफ म्हणाले ते असंवेदनशील वक्तव्य असल्याचे सुप्रीय सुळे म्हणाल्यात.

Published on: Apr 19, 2025 01:06 PM