Mahayuti Tensions : रवींद्र चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम? आक्रमक देहबोलीनं चर्चा

| Updated on: Dec 08, 2025 | 11:06 AM

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर आले, मात्र त्यांच्यातील दुरावा कायम दिसला. स्थानिक पातळीवरील "फोडाफोडी" आणि निधीच्या मुद्द्यांवरून हा वाद सुरू असून, शिंदे यांची देहबोली आक्रमक होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील या संघर्षाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात त्यांच्यातील राजकीय दुरावा स्पष्टपणे दिसून आला. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या स्थानिक नेत्यांच्या फोडाफोडीवरून हा वाद सुरू असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदे यांची देहबोली आक्रमक होती, तर रवींद्र चव्हाणांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदललेले दिसले.

कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात निधीच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमकही उडाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हे अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडायचे नाहीत असे ठरले असले तरी, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या कारणांवरून त्यांच्यात कलगीतुरा सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणाचे वर्चस्व राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Published on: Dec 08, 2025 11:06 AM