मालेगाव बाजार समितीत ‘हमाली’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; शेंगा विक्रीची जागाही व्यापाऱ्यांनी लाटली

| Updated on: May 24, 2023 | 10:15 AM

आता मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी चांगली कामे पार पडतील त्यांच्या अडचणी सुटतील असे वाटतं होतं. मात्र आता त्यावर काहीच उपाय होत नसल्याचेच समोर येत आहे. येते भुईमुग शेंगा विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे जागे अभावी हाल होताना दिसत आहे.

Follow us on

मालेगाव : बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात पालकमंत्री दादा भुसे व ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यात हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने 18 पैकी 14 जागांसह निर्विवाद बहुमत मिळविले. यानंतर आता मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी चांगली कामे पार पडतील त्यांच्या अडचणी सुटतील असे वाटतं होतं. मात्र आता त्यावर काहीच उपाय होत नसल्याचेच समोर येत आहे. येते भुईमुग शेंगा विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे जागे अभावी हाल होताना दिसत आहे. तर माल उचलायला हमाल नाहीत पण हमाली मात्र कापली जात असल्याचे उघड होत आहे. तसा आरोपच शेतकरी वर्गातून केला जात आहे. त्यामुळे एका आर्थी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. तर शेंगा लिलावासाठी जी जागा दिली होती त्यावर व्यापाऱ्यांच्या माल आहे. यावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर बाजार समितीच्या अधिकाऱ्यानंकडे जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यावरूनच काही काळ शेतकरी आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र काही संचालकांच्या मध्यस्थी ने लिलाव पूर्ववत झाली आहे.